Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • दुष्काळी नियोजनात पाणी, अन्न व चाऱ्याला प्राधान्य द्या : मंत्री छगन भुजबळ
Nashik

दुष्काळी नियोजनात पाणी, अन्न व चाऱ्याला प्राधान्य द्या : मंत्री छगन भुजबळ

नाशिक | २४ ऑक्टोबर २०२६ रोजी येवला संपर्क कार्यालयात दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांच्या आढाव्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य वितरण आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या नियोजनाला सर्वांत जास्त प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी व पशुधन चारा नियोजन

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून, पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार विहिरी व बोअरवेल अधिग्रहित कराव्यात. टँकरची मागणी लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे. तसेच, पशुधनासाठी चारा उपलब्धते वाबत वनविभागाच्या क्षेत्रात चारा लागवड तपासण्याचे आणि मेंढपाळांसाठी चाऱ्याची सोय करण्याचे आदेश त्यांनी दिले. येवला, राजापूर, धुळगाव आणि विंचूर-लासलगावसह विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

वीजपुरवठा व पायाभूत विकासकामे

येवला व निफाड तालुक्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर, नादुरुस्त रोहित्रे तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच लासलगाव येथील घरकुल आवास योजना, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा, पिंपळस ते येवला, लासलगाव-विंचूर आणि खेडलेझुंगे येथील चौपदरी रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. याशिवाय शीव नदी आणि लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

Source: Cosmo News Desk

Related Posts