Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये गोदावरी कालवा अस्तरीकरणाला तीव्र विरोध, शेतकऱ्यांचा ठिया
Nashik

नाशिकमध्ये गोदावरी कालवा अस्तरीकरणाला तीव्र विरोध, शेतकऱ्यांचा ठिया

नाशिक | गोदावरी उजवा तट कालवाच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणामुळे शेतकरी, भूजल पुनर्मरण आणि ग्रामीण भागातील जलसुरक्षेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून योग्य निर्णय घेण्याच्या मागणीसाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्थानिक गावांमधील शेतकऱ्यांसमवेत गोदावरी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिया मांडला होता. या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांची भूमिका व भीती

कालवा परिसरातील अनेक गावांमधील विहिरी, बोअरवेल, कुपनलिका आणि इतर जलस्त्रोतांचे पुनर्मरण कालव्यातील पाण्याच्या झिरपण्यावर अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरसकट सिमेंट काँक्रिट अस्तरीकरण केल्यास भूजल पुनर्मरणावर परिणाम होण्यासह शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेवर दुष्परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रत्येक गावातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अस्तरीकरण करण्याऐवजी गावनिहाय आवश्यकता तपासली जावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

प्रशासनाचे आश्वासन आणि सीमंतीनी कोकाटे यांची मागणी

चर्चेनंतर प्रशासनाने संबंधित कालवा परिसरात प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे आश्वासन दिले. अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावनिहाय परिस्थितीची पाहणी करून सहमतीने योग्य तोडगा काढला जाईल. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनीही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली असून, अस्तरीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वकष तांत्रिक अभ्यास करण्याची भूमिका मांडली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts