Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • दुष्काळी अनुदानापायी कर्जवसुली करू नका; प्रशासनाचा बँकांना इशारा
Nashik

दुष्काळी अनुदानापायी कर्जवसुली करू नका; प्रशासनाचा बँकांना इशारा

नाशिक | खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेली ही अग्रीम मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणारे अनुदान यातून कोणत्याही बँकेने कर्जवसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

अनुदानाची रक्कम होल्ड वा कपात करू नका

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत आणि अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम बँक खात्यावर होल्ड करू नये किंवा कपात करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. शासना kडून मिळणारे हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या कठीण काळात दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वळती केली जाऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई

यापूर्वी जर अशी रक्कम वळती करण्यात आली असेल किंवा खात्यावर होल्ड ठेवली असेल, तर त्या प्रकरणांची तपासणी करून नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांनी सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी व इतर बँकांच्या शाखा व्यवस्थापाकांना या निर्देशांची माहिती देऊन त्याचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास लागू कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts