Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक सिंहस्थात रामकुंड व कुशावर्तावर विशेष टपाल तिकिटे
Nashik

नाशिक सिंहस्थात रामकुंड व कुशावर्तावर विशेष टपाल तिकिटे

नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक व सांस्कृतिक वारसाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ उपक्रमांतर्गत रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन पवित्र स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटे तयार केली आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण होणार आहे. या तिकिटांच्या माध्यमातून सिंहस्थातील वैष्णव आणि शैव परंपरांचे दर्शन घडणार आहे.

वैष्णव व शैव परंपरांचे दर्शन

नाशिकमधील रामकुंड हे वैष्णव परंपरेशी संबंधित आहे, तर त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ हे शैव परंपरेशी निगडित महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. या दोन्ही स्थळांची निवड करून सिंहस्थाच्या आध्यात्मिक परंपरेचे वैशिष्ट्य टपाल तिकिटांच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. रामकुंडाच्या टपाल तिकिटावर रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुक रचना, तीर्थाचे पावित्र्य आणि सिंहस्थाशी असलेले अतूट नाते चित्रित करण्यात आले आहे.

ऐतिहासिक ठेवा आणि वारसा जतन

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर आधारित तिकिटातून शैव परंपरेचा वारसा अधोरेखित करण्यात आला आहे. कुशावर्त तीर्थाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुक रचना आणि पार्श्वभूमीवरील ब्रह्मगिरी पर्वतारांग यांचे दर्शन या तिकिटातून घडणार आहे. याविषयी बोलताना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहाराचे माध्यम नसून देशाचा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक ठेवा जतन करणारे प्रभावी माध्यम आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्याची परंपरा आणि तीर्थस्थळांचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts