Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • १६० कोटींच्या शालार्थ आईडी घोटाळ्यात गरुड बंधू आणि हिंगणेकरांच्या जामीनावर सुनावणी
Nashik

१६० कोटींच्या शालार्थ आईडी घोटाळ्यात गरुड बंधू आणि हिंगणेकरांच्या जामीनावर सुनावणी

नाशिक | राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आईडी घोटाळा प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेले शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड आणि जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणेकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

गरुड बंधू आणि हिंगणेकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी

शालार्थ आईडी घोटाळ्याच्या सखोल तपासादरम्यान नाशिक शहर गुन्हे शाखेने संजय गरुड याला २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याचा भाऊ आणि संबंधित शिक्षण संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यालाही पोलिसांनी अटक केली. याआधी या प्रकरणात गरुड बंधूंसह माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणेकर यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. २७) सुनावणी ठरलेली होती. यादरम्यान सरकार पक्षाचे सहायक अभियोक्ता तसेच संशयितांच्या वतीने वकील न्यायालयात उपस्थित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता न्यायालयाकडून या अर्जावर बुधवारी (दि. २८) सुनावणी घेतली जाणार आहे.

अमोल कुलकर्णीच्या कोठडीत वाढ आणि विनोद तराळ पसार

दरम्यान, याच प्रकरणात अमोल रमेश कुलकर्णी याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला, त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला सोमवारी (दि. २६) नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. अमोल कुलकर्णी हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला आहे. संबंधित संस्थेचा सचिव विनोद रामदास तराळ याच्यासाठी शालार्थ आईडी मिळवून देण्यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दुसरीकडे, विनोद तराळ याचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून, तो सध्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणातील आर्थिक व्यवहार, वेगवेगळ्या संशयितांची नेमकी भूमिका आणि शालार्थ आईडी मिळविण्यासाठी झालेल्या कथित गैरव्यवहारांचा कसून तपास शहर गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts