Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडे ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवाचे यजमानपद
Nashik

नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडे ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवाचे यजमानपद

नाशिक | महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या निर्देशांनुसार २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापिठीय सांस्कृतिक युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाचा मान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास प्राप्त झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार दि. १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या मुख्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात राज्यातील २७ विद्यापीठांचे सुमारे १,२०० ते १,३०० विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. २००८ आणि २०१८ नंतर तिसऱ्यांदा आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाचा बहुमान विद्यापीठाला मिळाला आहे.

स्पर्धांचे स्वरूप आणि आयोजन

महोत्सवात संगीत, नृत्य, वाङ्‌मयीन कला, रंगमंचीय कला आणि ललित कला या पाच प्रमुख कला प्रकारांतर्गत विविध २९ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात एकांकिका, मूकाभिनय, मिमिक्री, शास्त्रीय गायन, समूहगायन, सुगम संगीत, वाद्यवादन, समूहनृत्य, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, पोस्टर मेकिंग, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, क्ले मॉडेलिंग प्रश्नमंजुषा, शिल्पकला या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांचे आयोजन विद्यापीठ मुख्यालयातील पाच विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने लोकभवनाच्या निरीक्षण व वित्त समितीने नुकतीच विद्यापीठाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.

विद्यापीठाची तयारी व समन्वय

महोत्सवाच्या आयोजनासाठी कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, ललित कला केंद्राचे संचालक सचिन शिंदे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. दत्ता पाटील, डॉ. नीरज बोरसे, अमोल पाटील, सिद्धांत टाक, मंगेश पवार, केशव चौधरी यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभरातील युवा कलावंतांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार असून, नाशिककरांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे आणि युवा कलागुणांचे दर्शन घडणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts