Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये गोदातीरी विश्वविक्रमी शंखनाद, गिनीज बुकमध्ये नोंद
Nashik

नाशिकमध्ये गोदातीरी विश्वविक्रमी शंखनाद, गिनीज बुकमध्ये नोंद

नाशिकच्या गोदाकाठी सामूहिक शंखनाद करताना उपस्थित शंखवादक

नाशिक | सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर नाशिकच्या गोदातीरी ५१७ शंखांचा एकाच वेळी निनाद घुमला. सामूहिक शंखवादनातील अमेरिकेच्या नावावर असलेला ३०३ जणांचा विक्रम मागे टाकत नाशिकने रविवारी (दि.२५) ६ वाजून ५ मिनिटे आणि ३५ सेकंदाला या विश्वविक्रमाची नोंद केली.

अमेरिकेचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम

नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंतविजय शंखनाद पथकाच्या पुढाकाराने देवमामलेदार पटांगणावर हा उपक्रम पार पडला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा केली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी गोदातीर दुमदुमून गेले. यापूर्वी अमेरिकेत ३०३ जणांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची नोंद होती.

मान्यवरांची उपस्थिती आणि पुढील नियोजन

या सोहळ्यात पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, उपमहापौर विलास शिंदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत गोपालदास, महंत रामकृष्ण महाराज, महंत मंगलपुरी महाराज उपस्थित होते. रामकुंड आणि कुशावर्ततीर्थ येथे ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या महाकुंभमेळा ध्वजारोहणावेळी २५१ शंखवादकांकडून पुन्हा सामूहिक शंखनाद होणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts