Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या काळ्या बिबट्याला जीवदान
Maharashtra

रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या काळ्या बिबट्याला जीवदान

वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी | वनविभागाने अत्यंत धाडसाने विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. या यशस्वी मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वन विभागाच्या कार्यालयाला भेट देत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उप विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून वनविभागाचे कौतुक

माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्यांना सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीवरून वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात ‘नंबर वन’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक

जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. सामंत पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वनाधिकारी या महिला आहेत. महिला असूनही अत्यंत सक्षमपणाने आणि धाडसाने त्या अशा आक्रमक वन्यप्राण्यांना हाताळतात आणि रेस्क्यू करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. हा प्राणी स्वभावतः आक्रमक असूनही या मोहिमेदरम्यान त्याने कोणालाही इजा पोहोचवली नाही आणि वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात या दुर्मीळ काळ्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले.

Source: Cosmo News Desk

Related Posts