Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राला विशेष पुरस्कार
Maharashtra

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राला विशेष पुरस्कार

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राला मिळालेला विशेष पुरस्कार स्वीकारताना प्रतिनिधी

नवी दिल्ली | नवी दिल्ली येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०२६ मध्ये भागीदार राज्य म्हणून उत्कृष्ट सहभाग नोंदविल्याबद्दल महाराष्ट्राला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गत भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थेतर्फे हा पुरस्कार महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाला प्रदान करण्यात आला. भारत मंडपम येथे झालेल्या समारamभादरम्यान महामंडळाच्या प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला. १४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ४५ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राने सहभाग घेतला होता.

प्रदर्शनीतील दालन आणि विविध उपक्रम

यंदाच्या मेळ्याची संकल्पना ‘विकास आणि वारसा’ अशी होती. महाराष्ट्राने ६४ प्रदर्शन दालनांच्या माध्यमातून राज्याची औद्योगिक प्रगती, उद्योजकीय क्षमता, पारंपरिक हस्तकला, सांस्कृतिक वैभव आणि स्थानिक उत्पादनांचे प्रभावी प्रदर्शन केले. महाराष्ट्र दालनात विविध जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, हातमाग उत्पादने, पारंपरिक हस्तकला आणि लघुउद्योगांच्या उत्पादनांना स्थान मिळाले होते. तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत निवडक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली.

उद्घाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रम

उद्योग, गुंतवणूक व सेवा तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन झाले होते. या प्रदर्शनामुळे राज्यातील उद्योजक, कारागीर आणि स्थानिक उत्पादकांना आपल्या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवून देण्याची संधी उपलब्ध झाली. मेळ्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts