Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; पालकमंत्र्यांनी केली विचारपूस
Maharashtra

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; पालकमंत्र्यांनी केली विचारपूस

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांची विचारपूस करताना पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला. जिल्ह्यातील अंजणारी पुलावर एका ट्रकची आणि खासगी बसची आपसात धडक झाली. या रस्ते दुर्घटनेमध्ये बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातातील चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

पालकमंत्र्यांची रुग्णालयात धाव

अपघाताची धडक माहिती मिळताच पालकमंत्री डाॕ. उदय सामंत यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी तिथे उपचारासाठी दाखल असलेल्या सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

रुग्णालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित

यावेळी पालकमंत्री डाॕ. उदय सामंत यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप उपस्थित होते. तसेच याप्रसंगी रुग्णालय प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारीवर्गही उपस्थित होता.

Source: Cosmo News Desk

Related Posts