Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीतून १० लाख क्युबिक मीटर गाळ काढणार
Maharashtra

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीतून १० लाख क्युबिक मीटर गाळ काढणार

चिपळूणमधील नदी गाळ उपसा मोहिमेची बैठक

रत्नागिरी | चिपळूणसह संपूर्ण जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये वाशिष्ठी नदीतून यावर्षी १० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.

नाम फाउंडेशनकडे गाळ काढण्याची जबाबदारी

राज्य शासनाने ‘नाम फाउंडेशन’सोबत ३१ रुपये प्रती क्युबिक मीटर दराने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, वाशिष्ठी नदीतील १० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याची संपूर्ण वर्कऑर्डर शासनाच्या नियमांनुसार नाम फाउंडेशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वाशिष्ठीसह जगबुडी, शास्त्री आणि अर्जुना यांसारख्या जिल्ह्यातील सहा मोठ्या नद्यांमधील साचलेला गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

छोट्या नद्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील ज्या छोट्या आणि नोंद नसलेल्या नद्या आहेत, त्यांच्या गाळ उपशासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील व मतदारसंघातील प्रत्येकी दोन नद्यांची निवड करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या नद्यांतील गाळ देखील ३१ रुपये प्रती क्युबिक मीटर दरानेच काढला जाईल. या सर्व सकारात्मक निर्णयांमुळे जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होऊन पूरनियंत्रणास मोठी मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts