Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • लासलगावमध्ये गॅस सिलिंडरसाठी आंदोलन, ग्राहकांची गैरसोय
Nashik

लासलगावमध्ये गॅस सिलिंडरसाठी आंदोलन, ग्राहकांची गैरसोय

नाशिक | लासलगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना मोठी वणवण करावी लागत आहे. गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात लासलगाव शहर विकास समितीने ढोल बजावून निषेध आंदोलन केले आहे. ऑनलाइन बुकिंग करून १० ते १५ दिवस, तर काही ग्राहकांना १५ ते २० दिवस उलटूनही गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. घरपोच वितरण सेवा विस्कळीत झाल्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, एजन्सीच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. काही ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट करूनही सिलिंडर मिळालेले नाही.

शहर विकास समितीचे आंदोलन आणि नागरिकांच्या तक्रारी

एजन्सीकडून ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे त्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात पर्यायी वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यात प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. परिसरातील ग्राहकांची गैरसोय दूर करून घरपोच सिलिंडर वितरण तातडीने सुरळीत करण्यात यावे, अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे. बुधवारपर्यंत ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका महिन्यापूर्वी गॅस सिलिंडरची नोंदणी करूनही सिलिंडर मिळाले नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.

तहसीलदारांची एचपीसीएलकडे कारवाईची मागणी

जाधव गॅस एजन्सीच्या अनियमित गॅस वितरणामुळे ग्राहकांना १० ते १५ दिवस बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. कंपनीकडून एजन्सीचा सिलिंडर पुरवठा बंद झाल्याची माहिती तपासणीदरम्यान समोर आल्यानंतर, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना जवळच्या एचपी गॅस एजन्सीशी तात्पुरते जोडून नियमित पुरवठा करण्याची मागणी निफाडच्या तहसीलदारांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) प्रादेशिक कार्यालयाकडे केली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांनी जाधव गॅस एजन्सीला भेट देऊन तपासणी केली आहे. आता एचपीसीएल प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts