Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड व कुशावर्त भागात गर्दी नियंत्रणावर भर
Nashik

सिंहस्थ कुंभमेळा: रामकुंड व कुशावर्त भागात गर्दी नियंत्रणावर भर

नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड (नाशिक) आणि कुशावर्त तीर्थ (त्र्यंबकेश्वर) येथे आयोजित करण्यात येणारे ध्वजारोहण सोहळे सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या सोहळ्यांच्या वेळी निर्माण होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचे स्पष्ट निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. प्राधिकरणाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये यासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पास वितरण आणि आसनव्यवस्थेचे नियोजन

या बैठकीत रामकुंड व कुशावर्ततीर्थ येथील ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणारे जनप्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पास वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. उपस्थितांच्या उपलब्ध संख्येनुसार विभागनिहाय आसनव्यवस्था निश्चित करून त्याचा अचूक आराखडा संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वारे, निर्गमन मार्ग तसेच बॅरिकेडिंगची योग्य व्यवस्था करून गर्दीवर प्रभावी नियंत्रण मिळवले जाणार आहे. गोदाआरतीसाठी रामकुंड येथे सायंकाळी भाविक व पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, स्वतंत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्यावर देखील भर देण्यात आला आहे.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना

ध्वजारोहण सोहळ्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनतळ, बसमधून उतरण्याचे निश्चित ठिकाण आणि कार्यक्रमस्थळापर्यंतच्या मार्गांचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी सामूहिक बससेवेचा पर्याय विचारात घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर कार्यालयांनी आपापसात समन्वय साधावा, असे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिशादर्शक फलक, पार्किंगची माहिती देणारे नकाशे आणि मार्ग स्पष्ट करणारे एनिमेटेड व्हिडिओ तयार करण्याबाबत चर्चा झाली असून, दोन्ही ठिकाणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts