Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • राजस्थानमध्ये बागलाणच्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू
Nashik

राजस्थानमध्ये बागलाणच्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू

नाशिक | राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनाला गेलेल्या बागलाण तालुक्यातील भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झाला. अजमीर-जयपूर मार्गावरील जयपूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेत अजमीर सौंदाणे येथील मगर कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले असून, सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नऊ ते दहा महिन्यांच्या तीन बालकांचाही समावेश आहे.

अपघाताची पार्श्वभूमी आणि मृत व्यक्ती

बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील मगर कुटुंबीय सोमवार (दि. १९) पासून राजस्थानच्या यात्रेला गेले होते. शनिवारी (दि. २४) पहाटे खाटूश्याम येथून दर्शन आटोपून सालासरकडे जात असताना त्यांची बस आग लागलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात संदीप रामसिंग मगर (५०), दीपक त्र्यंबक मगर (६५) आणि महेश विजयसिंग मगर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे मृत तिघे चुलतभाऊ असल्याचे समजते. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, तो बागलाण तालुक्यातील मेंढीपाडा येथे राहत होता आणि त्याचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील साक्री असल्याचे समोर आले आहे.

मदतकार्य आणि राज्यपालांची भेट

अपघातानंतर जखमी व मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांना गावी आणण्यासाठी राजस्थानमधील करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केली. रविवारी (दि. २५) पहाटेपर्यंत मृतदेह व जखमींचे वाहन अजमीर सौंदाणे येथे पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी रवींद्र पवार यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मदतीची विनंती केली. त्यानंतर राज्यपाल बागडे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि उपचाराबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Source: Cosmo News Desk

Related Posts