Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • शालार्थ आयडी घोटाळा: सेवानिवृत्त वेतन अधीक्षक अटकेत
Nashik

शालार्थ आयडी घोटाळा: सेवानिवृत्त वेतन अधीक्षक अटकेत

नाशिक | राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षक राजमोहन हरिप्रसाद शर्मा (वय ५८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घोटाळ्यात शासनाची तब्बल १० कोटी ९ लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिकरोड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीची कारवाई आणि पथकाची कामगिरी

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या पथकातील पोलिस हवालदार राहुल जगजाप, पोलिस अमवलदार संदीप भुरे, राकेश राऊत आणि गुरू गांगुर्डे यांनी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपी शर्मा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. मूळ मंजुरी आदेश नसतानाही वेतन अदा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

११ शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता

अटक करण्यात आलेले राजमोहन हरिप्रसाद शर्मा जळगाव येथे वेतन अधीक्षक म्हणून कार्यरत असताना शालार्थ आयडीचे ड्राफ्ट अपलोड करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ मंजुरी आदेश प्राप्त झालेला नसतानाही, तसेच कार्यालयीन अभिलेखांची पडताळणी न करता संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संगणकीय प्रणालीतील नोंदीची सत्यता तपासून न पाहता वेतन अदा करण्यात आल्याचा आरोप आहे. जळगाव येथील ११ शाळांमधील ९५ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता नसतानाही बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे नोंदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts