Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Maharashtra

रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या बैठकीत

मुंबई | झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) रखडलेल्या प्रकल्पांची जबाबदारी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने घ्यावी आणि हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या ४५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी यांच्यासह संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

थकीत भाडे वसुली आणि समूह पुनर्विकास योजना

सप्टेंबर २०२६ अखेरच्या आढाव्यानुसार खासगी विकासकांकडे वितरित केलेल्या ६६७ संक्रमण सदनिकांच्या भाड्यापोटी मोठी थकबाकी आहे. सवलतींचा विचार करून निश्चित करण्यात आलेली ही थकीत रक्कम प्राधान्याने, प्रभावी पाठपुरावा करून आणि कालमर्यादेत वसूल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बैठकीत कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांना गती देण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सहा समूह आणि उल्हासनगरमधील २९ पेक्षा अधिक समूहांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. या सर्व योजनांसाठी आवश्यक सर्वेक्षण, नियोजन आणि सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना आणि परवडणारी घरे

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९० आणि कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० अशी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावाही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्व प्रकल्प अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट आणि विकासक यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सुधारित आकृतिबंध आणि सेवाशर्ती नियमावलीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Source: Cosmo News Desk

Related Posts