Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार: हसन मुश्रीफ
Maharashtra

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार: हसन मुश्रीफ

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार | पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध असून, त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

शेतकऱ्यांशी संवाद आणि अडचणींची पाहणी

दौऱ्यादरम्यान पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्य:स्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच, येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Source: Cosmo News Desk

Related Posts