Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महात्मा फुले द्विशताब्दी: फुलेवाडा, भिडेवाडा विकासाला गती देण्याचे निर्देश
Maharashtra

महात्मा फुले द्विशताब्दी: फुलेवाडा, भिडेवाडा विकासाला गती देण्याचे निर्देश

मंत्रालयात पार पडलेली ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

मुंबई | महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि भिडेवाडा येथील सुशोभिकरण व विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. मंत्रालयात आयोजित ओबीसी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अतुल सावे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून दुष्काळ निवारणासाठी कार्यरत आठ विभागांनी त्यांच्या नावाने योजना तयार करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

वसतिगृहे, ओबीसी अनुशेष आणि अभ्यास समिती

राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांकरिता १२ जागा निश्चित झाल्या असून १५ ठिकाणी नाममात्र एक रुपया दराने जागा देण्याची योजना तयार करून १५ दिवसांत जागा निश्चिती पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले. प्रत्येक वसतिगृहात ५०० विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था असेल. तसेच ओबीसी प्रवर्गातील रिक्त पदे व भरतीमधील अनुशेष दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी माहिती सादर करावी. भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विकासासाठी शिंदे समितीच्या धर्तीवर स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्याबाबत आणि त्यांना स्वतंत्र अर्थसंकल्पीय लेखाशीर्ष मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यात वित्त विभागाकडे मागणी करण्याचे ठरले. कलिना येथील फुले, शाहू, आंबेडकर इंटरनॅशनल ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री यांना निमंत्रित करण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली.

Source: Cosmo News Desk

Related Posts