Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सिंचन प्रकल्पांना गती देणार; महसूलमंत्र्यांचे निर्देश
Maharashtra

सिंचन प्रकल्पांना गती देणार; महसूलमंत्र्यांचे निर्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंचन प्रकल्पांच्या बैठकीत आढावा घेताना

मुंबई | प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना आणि पेंच उजव्या मुख्य कालव्याच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सिंचन प्रकल्पांची प्रगती, निधीची उपलब्धता, प्रलंबित कामे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

निधीचे नियोजन आणि अर्थसंकल्पीय तरतूद

प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निधीचे पुनर्विनियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांची देयके प्रलंबित राहू नयेत आणि सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे तातडीने तयार करावीत. निधीच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करून पूरक अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पुनर्वसन आणि बाधित कुटुंबांचे प्रश्न

धरणाच्या पाणीसाठ्याची उंची वाढल्यामुळे पूर्वी निश्चित केलेल्या पुनर्वसनाच्या जागा अपुऱ्या ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागांचा शोध घेणे, जमीन संपादन करणे आणि नव्याने पुनर्वसन आराखडा तयार करणे याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित कुटुंबांना भूखंड, रस्ते, पाणी व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक मदतीच्या मागण्यांचाही नियमानुसार विचार करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts