Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक महापालिका पूर्व विभाग सभेत पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नाराजी
Nashik

नाशिक महापालिका पूर्व विभाग सभेत पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या प्रश्नावर नाराजी

नाशिक | नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागाच्या सभेत पाणीटंचाई, ड्रेनेज, रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षितेचे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. दिवाळीपूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक कामांमध्ये दिरंगाई होत असून, तक्रारींचे निराकरण वेळेत होत नसल्याबद्दल सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पूर्व विभाग सभापती मंगला नानावारे यांनी सर्व कामे नियोजनबद्ध आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

रस्ते, ड्रेनेज आणि पाणीटंचाईचे प्रश्न

नगरसेवक श्याम बडोदे यांनी सम्राट चौक ते कलानगर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. विकासकामांच्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक अजिंक्य साने यांनी सायकल ट्रॅकवरील ड्रेनेज चेंबर आणि खचलेला रस्ता यांचा मुद्दा मांडून आंदोलनाचा इशारा दिला. नगरसेविका आशा तडवी यांनी उत्तरनगर, रामदास स्वामीनगर, श्रीकृष्णनगर आणि कमला पार्क येथील पाणीटंचाईचा प्रश्न मांडला. तसेच महापालिकेचे टँकर वेळेवर मिळत नसल्याची आणि खासगी टँकरसाठी पैसे आकारले जात असल्याची तक्रार केली. नगरसेविका पूजा नवले यांनी गौतमनगरमधील पिण्याची जुनी पाइपलाइन २००३ पासून बदलली नसल्याचे सांगत ती तातडीने बदलण्याची मागणी केली. ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी घरातील बाथरूममध्ये शिरत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप

नगरसेविका समेरा खान यांनी अतिक्रमणाच्या प्रश्नावर ठोस कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास थेट महापालिका आयुक्तांकडे प्रश्न मांडण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरांचा उपद्रव आणि हिवाळ्यातही १० ते १२ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेविका जागृती गांगुर्डे यांनी जेट मशीन वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. नगरसेविका सीमा पवार यांनी रस्त्याच्या डांबरीकरणा अभावी उडणाऱ्या धुळीचा आणि टँकर वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या प्रतिसाताबद्दल नाराजी व्यक्त केली.

Source: Cosmo News Desk

Related Posts