Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नवनियुक्त शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योगदान द्यावे
Maharashtra

नवनियुक्त शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योगदान द्यावे

नाशिक येथे नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम

नाशिक | आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी नवनियुक्त शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे. एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, नाशिक येथे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागात नवनियुक्त झालेल्या शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक भरती आणि शिक्षकांची जबाबदारी

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विभागाने प्रयत्न चालवले आहेत. पात्र व सक्षम शिक्षकांची निवड करण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून, यामध्ये पूर्णपणे गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आले आहे. नवनियुक्त शिक्षकांनी या नियुक्तीकडे केवळ नोकरी म्हणून न बघता, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची एक मोठी जबाबदारी म्हणून पाहावे. शिक्षकांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ राहून विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण द्यावे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, प्रवेशसंख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे मार्गदर्शन मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन

या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील नवनियुक्त शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्ये आणि महत्त्वाकांक्षा विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला योग्य प्रोत्साहन दिल्यास तो जीवनात नक्कीच मोठी प्रगती करू शकतो. शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य वाव द्यावा, असे आवाहन मंत्री श्री. झिरवाळ यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान खासदार भास्कर भगरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, जिल्ह्यातील विविध आदिवासी आश्रमशाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना मंत्री डॉ. अशोक वुईके, मंत्री नरहरी झिरवाळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अधिकृतपणे नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार किशोर दराडे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपायुक्त संतोष ठुबे आणि श्री. हिवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts