Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • सांगलीतील उपसा सिंचन योजनांचे रब्बी आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरू करा
Maharashtra

सांगलीतील उपसा सिंचन योजनांचे रब्बी आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरू करा

सांगली जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक आणि उपस्थित अधिकारी

सांगली | अल निनोच्या प्रभावामुळे सांगली जिल्ह्यात सरासरी ६४ टक्केच पाऊस झाल्याने आणि काही तालुक्यांत ४० ते ५० टक्केच पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यावर मोठा ताण आला आहे. यंदा खरीप हंगामासाठीही धरणांतून पाणी सोडावे लागल्यामुळे रब्बी हंगामाचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचे रब्बी आवर्तन पूर्वनियोजित १५ डिसेंबरऐवजी १५ नोव्हेंबरपासूनच सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

पाणी नियोजन आणि बैठकीतील चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उष्णता वाढल्यामुळे बाष्पीभवन ६ ते ७ टक्क्यांनी वाढत असून, उपलब्ध पाण्याचे ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बीसाठी केवळ एकच आवर्तन देता येईल आणि उर्वरित दोन आवर्तने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावी लागतील.

कोयना धरण आणि पाणी विसर्ग

कोयना धरणात सध्या सुमारे ८५ टक्के पाणीसाठा असून सांगलीची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन विद्युतगृहतून नदीपात्रात २,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडणार नाही आणि नागरिकांना प्रदूषणमुक्त पाणी मिळेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी पुनर्भरण करून ते पुन्हा धरणात आणण्याच्या कामासाठी आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत पाण्याच्या आवर्तनांचे नियोजन, उपसाबंदी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

Source: Cosmo News Desk

Related Posts