Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार: मंत्री गोगावले
Maharashtra

फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार: मंत्री गोगावले

मंत्रालयातील बैठकीत फळबागांच्या मदतीबाबत चर्चा करताना मंत्री भरत गोगावले आणि अधिकारी

मुंबई | राज्यातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील फळबागा जगविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. राज्यातील एकूण ६ लाख ८५ हजार हेक्टर फळबागांपैकी सुमारे २.५ लाख हेक्टर क्षेत्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात आहे.

फळबागा वाचवण्यासाठी मदतीची मागणी

विधानसभा सदस्य सुरेश धस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील १४ जिल्ह्यांमध्ये बाधित होणाऱ्या फळबागा जगविण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री गोगावले यांच्याकडे केली होती. मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री गोगावले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पाणीपुरवठ्याअभावी उभी असलेली फळबाग नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

विशेष बाब म्हणून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव

केंद्र सरकारकडून व्हीबी जीरामजी योजनेअंतर्गत ३७५ कामांकरिता राज्यासाठी ४४२० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्या निधीबरोबरच फळबाग बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने मदत करावी, असा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले. या बैठकीस रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, सहसचिव कैलास साळुंके, फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे, फलोत्पादन संचालक जीवन बुंदे आणि व्हीबी जीरामजी योजनेच्या आयुक्त अनिता मेश्राम उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts