Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • दुष्काळी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
Maharashtra

दुष्काळी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

दुष्काळी भागातील आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय शिबिराचे प्रातिनिधिक चित्र

छत्रपती संभाजीनगर | दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेती आणि पाण्याच्या प्रश्नोसोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याची कमतरता, उष्णतेशी संबंधित आजार, कुपोषण आणि मानसिक तणावामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आरोग्यसेवांचे प्रभावी समन्वयन करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती, तपासणी आणि उपचार वेळेत पोहोचवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

तालुका व जिल्हास्तरावर कक्ष आणि समित्यांची स्थापना

दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन केला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती होईल. हा कक्ष आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार विभागाच्या योजना आणि धर्मादाय रुग्णालयांद्वारे उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच, अपात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आमदार अध्यक्ष असणारी तालुकास्तरीय समिती आणि पालकमंत्री अध्यक्ष असणारी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिरे आणि व्यापक वैद्यकीय साहाय्य

दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांचा शोध उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आशा सेविकांच्या माध्यमातून घेतला जाईल. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह व रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्यांवर विशेष लक्ष दिले जाईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी रुग्णालये आणि सेवाभावी संस्थांची मदत घेऊन आरोग्य शिबिरे, फिरती वैद्यकीय पथके आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय संस्थांच्या समन्वयातून दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts