Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार
Maharashtra

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार

पुण्यातील ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समूहाच्या उत्पादन सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याचे दृश्य

पुणे | स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राची प्राथमिकता आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, पुण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही शहरे ईव्ही उद्योगाची महत्त्वाची केंद्रे बनत आहेत. येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केला. पुण्यात ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल समुहाच्या सहा नवीन उत्पादन सुविधांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, बी. एल. संतोष, ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता आणि सुनंदा मेहता उपस्थित होते.

ईव्ही उद्योगाला चालना आणि शासकीय धोरण

मुख्यमंत्री म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण आणि जीवाश्म इंधनावरील आयात कमी होण्यास मदत होणार आहे. ऑटोमोबाईल उद्योग हा रोजगारनिर्मिती आणि पूरक उद्योगांच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा घटक आहे. आगामी तीन वर्षांत महाराष्ट्राला ५० हजार इलेक्ट्रिक बसची आवश्यकता असून, राज्यातील उद्योगांनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवावी. इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तारासाठी हरित ऊर्जेचा वापर वाढविण्यावर राज्याचा भर असून, वीज निर्मितीमध्ये हरित ऊर्जेचा वाटा वाढविला जाणार आहे. चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वंकष आराखडा तयार केला असून, महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्यात येईल. पिनॅकल समूहाच्या एका उत्पादन सुविधेत ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी दिली आहे. पिनॅकल समूहाच्या नव्या उत्पादन सुविधांमुळे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी राज्यातच पूर्ण होण्यास मदत होईल.

केंद्रीय मंत्र्यांचे मार्गदर्शन व राज्याचा औद्योगिक विकास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. इलेक्ट्रिक वाहने, ट्रक आणि बस निर्मितीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी आहे. जीवाश्म इंधनावरील आयात कमी करून स्वदेशी पर्यायी इंधन, जैवइंधन, इथेनॉल आणि हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देणे ही केंद्र सरकारची भूमिका आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक उत्पादन क्षेत्रातील प्रमुख शक्ती म्हणून पुढे जात आहे. ऑटोमोबाईल आणि वाहन सुटे भाग उद्योग हा देशाच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, भक्कम औद्योगिक पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारे सरकार यामुळे पुणे आणि महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी पसंतीचे केंद्र ठरत आहे. ईका समूहाने उत्पादन, संशोधन, विकास आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांत महिलांना समान रोजगाराच्या संधी दिल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts