Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणार महाआयडी आणि महासारथी
Maharashtra

शासकीय कामकाजात पारदर्शकता आणणार महाआयडी आणि महासारथी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत मार्गदर्शन करताना

मुंबई | कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरामुळे शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महासारथी पोर्टलचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध नवीन सेवा आणि डिजिटल प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

नवीन डिजिटल प्रणाली आणि पोर्टलचा शुभारंभ

सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत ‘महाडीबीटी २.०’, ‘आपले सरकार २.०’, ‘मैत्री’ पोर्टलवरील नवीन सेवा आणि ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. ‘महाडीबीटी २.०’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४, कामगार विभागाच्या १० आणि महिला व बालविकास विभागाच्या दोन अशा एकूण ३६ नवीन योजना सुरू करण्यात आल्या. ‘आपले सरकार २.०’ पोर्टलवर परिवहन विभागाच्या ६१ सेवांसह विविध विभागांच्या एकूण ७१ सेवा सुरू झाल्या. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवांचा समावेश करण्यात आला. ‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित केलेल्या ‘महा-इंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मद्वारे मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. याद्वारे शासकीय डेटा देशाबाहेर जाणार नाही किंवा एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

महाआयडी आणि लाभार्थ्यांची प्रभावी पडताळणी

शासकीय कामकाजासाठी एकात्मिक डेटाबेस आणि एआयचा वापर करण्याच्या दृष्टीने ‘महाआयडी’चे सॉफ्ट लॉन्च करण्यात आले असून, आतापर्यंत एक कोटीहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सार्वभौम एआयचा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ‘महासारथी’ या उपक्रमामध्ये विविध विभागांच्या माहितीचे एपीआय इंटिग्रेशन केल्यास संबंधित डेटाचे सातत्याने अद्ययावतीकरण शक्य होईल. यामुळे योजनांची अंमलबजावणी, निधीचा विनियोग आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. केवळ डिजिटल व्यवस्था उभारणे पुरेसे नसून विभागांनी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू करावा आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना जोडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Source: Cosmo News Desk

Related Posts