Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • जैन समाजातील दुर्बल घटकांसाठी व्याजमुक्त कर्ज आणि रोजगार देणार
Maharashtra

जैन समाजातील दुर्बल घटकांसाठी व्याजमुक्त कर्ज आणि रोजगार देणार

मुंबईत जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कर्ज वितरण कार्यक्रमात मंत्री उपस्थित

मुंबई | जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी करण्यासाठी शासनामार्फत व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासही प्रोत्साहन देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. घाटकोपर येथील आराध्य भक्ती पार्क येथे जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने आयोजित कर्ज वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, प्रमुख संयोजक पराग शाह, महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, जैन मुनी नम्र मुनी महाराज, साध्वी तसेच जैन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कर्ज वाटप आणि मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

कार्यक्रमात शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना आणि महिला बचत गट कर्ज योजना या तीन योजना अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्जवितरणाचे धनादेश प्रदान करण्यात आले. या योजनांच्या पहिल्या टप्प्यात एकूण ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. तसेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे आवाहन आणि वारसा जतन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून शासनाच्या मदतकार्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळामार्फत शिष्यवृत्ती, विधवा महिलांना व्यवसायासाठी अनुदान, पाठशाळांचे आधुनिकीकरण तसेच विहारधाम उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. जैन धर्मातील अहिंसा, जीवदया आणि विश्वकल्याणाची शिकवण मार्गदर्शक असून, वारसा जतन करण्यासोबतच साहित्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील.

Source: Cosmo News Desk

Related Posts