Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • कार्तिकी वारीच्या सुविधांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
Maharashtra

कार्तिकी वारीच्या सुविधांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

पंढरपुरात कार्तिकी वारीच्या सुविधांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर | कार्तिकी वारी 2026 च्या अनुषंगाने प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या नियोजनाचा आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमधील 65 एकर (भक्ती सागर), वाळवंट आणि चंद्रभागा नदीपात्र परिसराला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांच्या सूचना दिल्या आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासकीय तयारीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुविधांची पाहणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या आधुनिक स्वच्छता वाहनाचे उद्घाटन केले. भक्ती सागर परिसरातील नदी घाटावर जाऊन त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली आणि स्वतः पाण्याचा फवारा मारून स्वच्छता केली. 65 एकर परिसरातील काही भागाचे काँक्रिटीकरण करण्याच्या आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आवश्यक विकासकामांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वारकऱ्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसरात उभारलेल्या रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली आणि नदीपात्रात बोट प्रवासात लाईफ जॅकेट अनिवार्य करण्याबाबत निर्देश दिले. पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी करून त्यांनी वारकऱ्यांना मोफत पाणी बॉटल्सचे वाटप केले.

आंबे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट

आंबे येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची तनपुरे मठ येथे भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सांत्वन केले. राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात धनादेशाद्वारे ही मदत दिली जाईल. तसेच, मृत कामगारांच्या कुटुंबातील मुलाला नोकरी आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Source: Cosmo News Desk

Related Posts