Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर
Maharashtra

लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर

लोहारी सावंगा गावातील प्रार्थना सभेत उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर

नागपूर | नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित एका विशेष प्रार्थना सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. कुठलेही संकट किंवा आपत्ती आल्यास तिचा सामना कसा करावा, याबाबत राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार मागील अनेक पिढ्यांसाठी आत्मिक बळ देणारे ठरले आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसोबत साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, याच पार्श्वभूमीवर ते लोहारी सावंगा गावात दाखल झाले होते.

प्रार्थना सभेला मान्यवरांची उपस्थिती

लोहारी सावंगा गावात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार चरणसिंह ठाकुर, आमदार आशिष देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार आणि माजी आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आणि गावचे सरपंच सतीश चापले हे देखील या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

भजनांनी भारले वातावरण

राष्ट्रसंतांना वंदन करून या प्रार्थना सभेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मौन प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाच्या भजन मंडळाच्या वतीने ‘शेतकऱ्यांनो कामकर्‍यांनो..’ आणि ‘मेरे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणादायी भजने सादर करण्यात आली. संकट काळात मानवी मनांना उभारी देणारी ही भजने मोझरी येथील अमोल बांबल, शितल मांडवगडे, गजानन गायकवाड, चेतन अंभोरे, सागर भालचक्र, आकाश वानखडे व श्रावण सोनटक्के यांच्या चमूने सादर केली. या भजनांमुळे गावात एका आश्वासक वातावरणाची निर्मिती झाली. अखेरीस राष्ट्रवंदनेने या प्रार्थना सभेची सांगता झाली.

Source: Cosmo News Desk

Related Posts