Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष
Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्काऊट स्कार्फ प्रदान करताना संघटनेचे पदाधिकारी

मुंबई | ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या १३ व्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड झाली आहे. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पदभार स्वीकारण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेच्या उपाध्यक्षा प्रतिभा पांड्या, मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल, अतिरिक्त मुख्य राष्ट्रीय आयुक्त एम. ए. खालिद, राष्ट्रीय आयुक्त मनीषकुमार मेहता, अतिरिक्त आंतरराष्ट्रीय आयुक्त मधुसूदन अवला, डीएएन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सनी पांड्या यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, देशातील ८० लाख सदस्यांच्या वतीने ही जबाबदारी आपण स्वीकारली असून, संघटनेची सदस्यसंख्या ५ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल. कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य सेवा आणि शिस्तीतून घडते आणि राष्ट्राचे भविष्य तरुण पिढीच्या चारित्र्यावर अवलंबून असते. युवा पिढीला योग्य दिशा देऊन त्यांच्यामध्ये सेवा, शिस्त आणि राष्ट्र व समाजाप्रति समर्पणाची भावना रुजवण्याचे कार्य या संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुण पिढी हा खरा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

संघटनेचा विस्तार आणि आगामी उद्दिष्टे

कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या उपाध्यक्षा प्रतिभा पांड्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. गेल्या ७६ वर्षांपासून शिक्षक, स्वयंसेवक आणि पालकांच्या योगदानातून ही चळवळ उभी राहिली असून आज तिची सदस्यसंख्या ८० लाखांहून अधिक झाली आहे, असे त्यांनी सांगितले. संघटनेचा विस्तार करताना ‘पोहोच, गुणवत्ता आणि अभिमान’ या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे संधी देणे, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांचे दर्जेदार प्रशिक्षण देणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सन्मान आणि पदभार स्वीकार

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेचे १३ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्षीय सनद आणि स्काऊट स्कार्फ प्रदान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला अधिक पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Source: Cosmo News Desk

Related Posts