Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर | राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावात पोहोचल्यानंतर महिलांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले आणि त्यांनी सामुदायिक प्रार्थनेत सहभाग घेतला. या गावी रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी भरीत भाकरीचे जेवण करून मुक्काम केला आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.

दुष्काळ आणि शेतकरी समस्यांवर चर्चा

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि सरपंच विपीन चाफले उपस्थित होते. कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मोकळेपणाने आपल्या समस्या मांडल्या. खोरी प्रकल्पाच्या मान्यतेबाबत लवकरच काम सुरू होईल असे सांगण्यात आले, तर ४३ वर्षांपूर्वीच्या पाझर तलावाच्या प्रश्नावर आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. रोही, वाघ आणि रानडुकरांपासून पिकांच्या रक्षणासाठी शेतीलगतच्या जंगलांना कुंपण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना आणि रेशन धान्याबाबत विचारणा केली असता, सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांवर धान्य वितरित केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर अशा १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दरम्यान, अपघातात पाय निकामी झालेल्या एका युवकावर संपूर्ण उपचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हास्तराप्रमाणेच आता दुष्काळी परिस्थितीमुळे तालुकास्तरावर देखील मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्लक्षित मानल्या जाणाऱ्या लोहारी सावंगा गावाला भेट देऊन आत्मविश्वास दिल्याबद्दल गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Source: Cosmo News Desk

Related Posts