Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • ओझरखेड धरण परिसरात साकारणार भगवान बिरसा मुंडांचे स्मारक
Nashik

ओझरखेड धरण परिसरात साकारणार भगवान बिरसा मुंडांचे स्मारक

नाशिक | जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देणारे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण परिसरात साकारण्यात येणार आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या पिढीला बिरसा मुंडांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी आणि आदिवासी समाजासह सर्व स्तरातील नागरिकांसाठी हे स्मारक प्रेरणास्थळ ठरावे, या उद्देशाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

स्मारकाचे स्वरूप आणि निधी

पाच एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या स्मारकात हातात धनुष्य घेतलेला २१ फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याला जिल्हा वार्षिक निधीचे योग्य नियोजन आणि वेळेत खर्च केल्याबद्दल राज्य शासन व मित्र संस्थेकडून मिळालेल्या आठ कोटी रुपयांच्या पारितोषिकापैकी चार कोटी रुपये या स्मारकासाठी वापरले जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग हा प्रकल्प राबवणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मागणीनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

परिसराचा विकास आणि कालावधी

हे स्मारक ऐतिहासिक स्मृती जपण्यासोबतच आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रेरणास्थळ ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत परिसरातील १० एकरापेक्षा अधिक जागेवर वृक्षारोपण करून जंगल विकसित केले जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ओझरखेड परिसरातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

एका वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, ९ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनापूर्वी ते पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts