Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकझोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करा
Maharashtra

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकझोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी डीपीआर सादर करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.

मुंबई | कुर्ला-ट्रॉम्बे परिसरात वर्षानुवर्षांपासून रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर, सुजात आंबेडकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांचा प्रश्न

कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील चिखलवाडी, आरसीएफ-प्रियदर्शनी ते माहुलपर्यंत रेल्वे ट्रॅकलगत वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्यामुळे झोपडीपट्टीधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एसआरएने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून पुनर्वसनासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.

खारदेव नगर आणि म्हाडा वसाहतींच्या समस्यांवर चर्चा

खारदेव नगर येथील मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बैठ्या पत्रा चाळ वसाहतीचा एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यावर चर्चा झाली. चेंबूर विधानसभा मतदारसंघातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी प्रीमियमबाबत नवे धोरण लागू करण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण रक्कम थांबविणे योग्य नाही असे सांगत, सहानुभूतीपूर्वक विचार करून प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील नेहरू नगर, टिळक नगर, सहकार नगर आणि नवीन टिळक नगर या म्हाडा वसाहतींमधील मलनिःसारण वाहिन्यांच्या समस्यांबाबत समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts