छत्रपती संभाजीनगर | राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांविषयीची आपली बांधिलकी कायम राखत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला आपल्या एका महिन्याचे वेतन मदत म्हणून सुपूर्द केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मदतीचा धनादेश आज देण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याच भेटीदरम्यान राज्यपाल बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदत निधीसाठीο दिला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.
मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार सुहास शिरसाट, आमदार अनुराधाताई चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी अधिकारी व नेतेमंडळी उपस्थित होती.
Source: Cosmo News Desk











