Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • नाशिकमध्ये ५१७ जणांचा सामूहिक शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडला
Maharashtra

नाशिकमध्ये ५१७ जणांचा सामूहिक शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडला

नाशिकच्या गोदाकाठी सामूहिक शंखनाद करताना उपस्थित शंखवादक

नाशिक | ५१७ व्यक्तींनी एकत्रितपणे शंखनाद करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घोषणा करताच गोदावरीच्या तीरावर ‘भारत माता की जय’चा नारा दुमदुमला. अमेरिकेतील एकाच वेळी ३०३ जणांनी शंखनाद करण्याचा जुना विक्रम मागे पडला आहे. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन या सोहळ्यात उपस्थित होते. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

विश्वविक्रमाची नोंद आणि पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नियमांनुसार या विक्रमाची पडताळणी दोन निरीक्षकांनी केली. ५०० हून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केली होती. शंख वाजवण्यासाठी श्वसनावर नियंत्रण, सराव आणि शारीरिक क्षमतेची गरज असते, त्यामुळे हा समन्वय आव्हानात्मक होता. पालकमंत्र्यांनी या यशाचे कौतुक केले. हा उपक्रम देशाच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी रामकुंड, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चे नियोजन

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा नसून प्रत्येक नाशिककराचा सोहळा आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा सन्मान राखण्याचे आणि आदरातिथ्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, निवास आणि भोजनाचे योग्य नियोजन प्रशासनाद्वारे केले जात आहे. व्यापारी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी समन्वयाने काम करून भाविकांचे वास्तव्य सुकर करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Source: Cosmo News Desk

Related Posts