Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • दुष्काळी परिस्थितीत पाणी, अन्न व चाऱ्याचे प्रभावी नियोजन करा : छगन भुजबळ
Maharashtra

दुष्काळी परिस्थितीत पाणी, अन्न व चाऱ्याचे प्रभावी नियोजन करा : छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ बैठक घेताना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना

नाशिक | दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. येवला संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी आणि पशुधन चारा नियोजन

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी असलेल्या विहिरी, बोअरवेलचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची स्थिती तपासून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या दृष्टीने चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे आणि वनविभागाच्या क्षेत्रात चारा लागवडीची शक्यता तपासावी. तसेच मेंढपाळ व चराऊ जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विकासकामे आणि वीजपुरवठा आढावा

येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा करावा. येवला व निफाड तालुक्यातील नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. लासलगाव येथील घरकुल आवास योजना, कचरा डेपोसाठी पर्यायी जागा, रस्ते कामे आणि नदी संवर्धन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Source: Cosmo News Desk

Related Posts