Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिक जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार ‘नासा’ दौर्याची संधी
Nashik

नाशिक जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार ‘नासा’ दौर्याची संधी

नाशिक | जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी ‘नाशिक ते नासा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील ‘नासा’ येथे शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात येत असून, या दौर्यात विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी तीन शिक्षकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

उद्देश आणि शिक्षकांचा सहभाग

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील विज्ञान, अवकाश संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची अनुभूती मिळावी, तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रवासात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांनाही या दौऱ्यात सामील करून घेतले जाणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड होणाऱ्या तीन शिक्षकांमध्ये किमान एक महिला शिक्षिका असणे आवश्यक आहे. हा शिक्षक जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असावा आणि परदेशातील या अभ्यास दौऱ्यात स्वैच्छेने सहभागी होण्यास तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार असावा.

निवडीचे निकष आणि मुदत

या दौऱ्यासाठी निवड होणाऱ्या शिक्षकाला इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे, संवाद कौशल्य, डिजिटल साक्षरता, वेळेचे व आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आणि अडचणीच्या प्रसंगी निर्णय घेण्याचे कौशल्य असणे अपेक्षीत आहे. शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय किंवा खाते चौकशी सुरू किंवा प्रस्ताविते नसावी तसेच कोणताही पोलीस गुन्हा दाखल नसावा. यासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरायची असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts