Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिककरांना दिलासा: पाणीपुरवठ्यात ३० दशलक्ष लिटरची वाढ
Nashik

नाशिककरांना दिलासा: पाणीपुरवठ्यात ३० दशलक्ष लिटरची वाढ

नाशिक | दिवाळीच्या सणासुदीच्या काळात पाण्याची वाढती गरज लक्षात घेत महापालिकेने एका महत्त्वपूर्ण निर्णयात शहराच्या पाणीपुरवठ्यात दररोज सुमारे ३० दशलक्ष लिटरने वाढ केली आहे. एकिकडे राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्णयाची तयारी सुरू असताना, दुसरीकडे नाशिककरांची दिवाळी पाण्याविना अडचणत येऊ नये यासाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एरवी महापालिकेतर्फे शहरात ५८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता, त्यात वाढ करून आता आठवडाभरासाठी दररोज ६१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीपुरवठा यंत्रणा आणि टंचाईची स्थिती

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण तसेच काही प्रमाणात मुकणे व दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून थेट जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर १३० जलकुंभ आणि २९०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे घरोघर पाणी पोहोचवले जाते. यंदा सुरुवातीच्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने धरणे भरली होती, मात्र परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने १० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. गंगापूर, मुकणे व दारणा धरणे काठोकाठ भरलेली असली, तरी शासनाचा नियम लागू असल्याने दिवाळीनंतर नाशिककरांवर पाणीकपात होणे अटळ बनले आहे.

सणासुदीच्या काळात अतिरिक्त पाणी आणि टँकर व्यवस्था

दिवाळीच्या साफसफाईमुळे सणासुदीच्या काळात नागरिकांच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यादरम्यान शहराच्या उंच-सखल भागात अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी समोर येत असतात. नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली. ज्या भागांत पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आहेत किंवा जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरेसे मिळत नाही, तिथे महापालिकेमार्फत २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गरज भासल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ करण्याची तयारी विभागाने ठेवली आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts