Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये ‘बालाजी लाडू’वर एफडीएची कारवाई, २५८ किलो लाडू जप्त
Nashik

नाशिकमध्ये ‘बालाजी लाडू’वर एफडीएची कारवाई, २५८ किलो लाडू जप्त

नाशिक | अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत वडनेर गेट परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या मे. श्री बालाजी लाडू या आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी या आस्थापनेची तपासणी केली असता, अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. या कारवाईमुळे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावस्थापकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अस्वच्छ वातावरणात निर्मिती आणि साठा जप्त

तपासणीदरम्यान या दुकानात लाडूंची निर्मिती व साठवणूक अत्यंत अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे उघडकीस आले. तयार करण्यात आलेले मोतीचूर लाडू संशयित निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या लाडूंमध्ये विहित मर्यादेपेक्षा अधिक अन्नरंग वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या सर्व गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित पावले उचलत २५८ किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या साठाची किंमत सुमारे ६४ हजार ५०० रुपये असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नोंदणी प्रमाणपत्र निलंबित आणि विशेष मोहीम

अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. या प्रकरणी आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित केले आहे. ही संपूर्ण तपासणी व जप्तीची कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि श्रद्धा राहिंज यांनी पार पाडली.

Source: Cosmo News Desk

Related Posts