Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये गुलाबी थंडीची चाहूल; तापमानात मोठी घट
Nashik

नाशिकमध्ये गुलाबी थंडीची चाहूल; तापमानात मोठी घट

नाशिक | जिल्ह्यात अखेर गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, तापमानाचा पारा झपाट्याने घसरू लागला आहे. शनिवारी नाशिक शहराचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर निफाडमध्ये १२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळात थंडीचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दिवाळीच्या सुरुवातीलाच वातावरणात लक्षणीय बदल जाणवू लागला असून, नागरिकांना आता गारव्याचा अनुभव येत आहे.

तापमानात सात अंशांची घसरण

नाशिक शहराच्या तापमानात गेल्या सहा दिवसांत तब्बल सात अंशांची घसरण झाली आहे. सोमवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर मंगळवारी १८.३, बुधवारी १८.२, गुरुवारी १८.४, शुक्रवारी १७.३, तर शनिवारी १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारली आणि ऑक्टोबरमध्ये उन्हाची तीव्रता कायम राहिली, ज्यामुळे नागरिकांना सलग दोन महिने उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या.

रब्बी हंगामासमोर आव्हान आणि अंदाज

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, अपेक्षित थंडी पडण्याची शक्यताही कमी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पेरणीसाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता कमी आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आणि चांगल्या प्रतीची जमीन आहे, त्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच रब्बीची पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यंदा मागील वर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असून हलक्या स्वरूपाची थंडी जाणवेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts