Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकचा एक्यूआय २३३ वर पोहोचल्याने हवेची गुणवत्ता खालावली
Nashik

नाशिकचा एक्यूआय २३३ वर पोहोचल्याने हवेची गुणवत्ता खालावली

नाशिक | नाशिककरांना सध्या प्रदूषित हवेचा सामना करावा लागत असून, शहरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) दैनिक हवा गुणवत्ता बुलेटिनमधील आकडेवारीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिकचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने वाढताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला १०६ असलेला हा निर्देशांक सोमवारी (दि. ९) दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी थेट २३३ वर गेल्याची नोंद झाली आहे. अवघ्या आठवडाभरात हवेच्या गुणवत्तेत झालेली ही घसरण नाशिकच्या पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. भारतीय एक्यूआय वर्गीकरणानुसार सोमवारचा हा २३३ चा आकडा खराब श्रेणीत मोडत असून, याचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हवेच्या गुणवत्तेतील आकडेवारी आणि वाढ

‘सीपीसीबी’च्या दैनिक बुलेटिननुसार वसुबारसच्या दिवशी गुरुवारी (दि. ५) १३४, शुक्रवारी (दि. ६) १७८, शनिवारी (दि. ७) १६० आणि रविवारी (दि. ८) दुपारी ४ वाजता निर्देशांक १७७ झाला होता. या आकडेवारीतून हवेतील प्रदूषणाचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. २ नोव्हेंबर रोजी १०६ असलेला हा निर्देशांक ९ नोव्हेंबर रोजी २३३ वर पोहोचला. यादरम्यान एक्यूआयमध्ये १२७ अंकांची वाढ झाली असून, निर्देशांकात सुमारे १२० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री ८ ते १० च्या दरम्यान एक्यूआय तब्बल ७०० ते ९०० पर्यंत पोहोचण्याचा दावा करण्यात येत असून, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निर्माण होणारा धूर आणि पीएम २.५ व पीएम १० या सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता अधिक खराब झाली.

आरोग्यावरील परिणाम आणि उपाययोजना

शहराचा एक्यूआय २३३ पर्यंत पोहोचणे ही आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. प्रदूषित हवेमुळे खोकला, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, दम लागणे आणि शवास घेण्यास त्रास होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. रस्त्यांची नियमित स्वच्छता, धूल नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी, बांधकामास्थळावरील नियमांची अंमलबजावणी, वाहनांची प्रदूषण तपासणी आणि औद्योगिक उत्सर्जनावर नियंत्रण या उपायांना प्राधान्य देणे गरजेचे ठरले आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts