Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • नाशिकमध्ये लक्ष्मीपूजन मुहूर्तावर ८०० कोटींहून अधिक उलाढाल
Nashik

नाशिकमध्ये लक्ष्मीपूजन मुहूर्तावर ८०० कोटींहून अधिक उलाढाल

नाशिक | लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत यंदा नाशिककरांनी सोने-चांदी, नवीन वाहने, घरे, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार, लक्ष्मीपूजन मुहूर्तावर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत मिळून ८०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात सुमारे ७०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती, ज्याच्या तुलनेत यंदा १०० कोटींची वाढ झाली आहे.

सोने-चांदी आणि वाहन बाजारातील उलाढाल

सोन्याच्या दाद झालेल्या चढ-उतारांमुळे ग्राहकांनी खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला. पारंपरिक दागिन्यांसह सोन्याची नाणी, लगड आणि चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी होती, ज्यामुळे सोने-चांदीच्या व्यवहारांतून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, नवरात्र, दसरा आणि दिवाळी एकाच कालावधीत आल्यामुळे वाहन बाजाराला मोठी चालना मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सुपूर्दगी घेण्यात आली. यंदा जिल्ह्यात १,२०० चारचाकी आणि ३,००० दुचाकी वाहनांची विक्री होऊन वाहन विक्रीतून सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये १,६०० इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश अपेक्षित आहे.

कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि बांधकाम क्षेत्रातील तेजी

मेन रोड, शालिमार, रविवार कारंजा सह शहरातील विविध दालनांमध्ये कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. रेडिमेड कपडे, महिलांचे पारंपरिक पोशाख आणि लहान मुलांच्या कपड्यांना मोठी मागणी होती. मागील वर्षी कपडे खरेदीतून १७० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. याशिवाय टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, संगणक आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह विद्युत रोषणाई, पणत्या, सजावटीचे साहित्य व पूजासाहित्याची खरेदी झाली. बांधकाम क्षेत्रातही सुमारे ७०० हून अधिक फ्लॅट, रो हाउस आणि प्लॉटचे व्यवहार झाल्याचे दिसून आले असून, नवीन घरांचे आरक्षण आणि गृहप्रवेशाला प्राधान्य देण्यात आले.

Source: Cosmo News Desk

Related Posts