Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया ऑनलाइन, सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही
Nashik

जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया ऑनलाइन, सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही

नाशिक | जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अर्जासाठी जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज उरलेली नाही. तसेच कागदपत्रांच्या प्रिंट काढून प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकतादेखील राहणार नाही.

डिजिटल प्रणाली आणि अर्ज करण्याची पद्धत

या प्रक्रियेसाठी शासनाने ‘कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (सीसीव्हीआयएस) ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या तांत्रिक मदतीने ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची सद्यःस्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्जासोबत आवश्यक मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. जात नोंदीसाठी तसेच निर्धारित कालावधीपूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येणार आहे. अर्जदाराने आधार क्रमांकाशी जोडलेल्या प्रणालीतून एकच अर्ज दाखल करता येणार आहे.

६० दिवसांत निर्णय आणि सेवा शुल्क

जात पडताळणी समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्जात त्रुटी असल्यास एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल आणि पूर्ततेसाठी दोन महिने संधी दिली जाईल. पाचव्या महिन्यात अंतिम ऑनलाइन सुनावणीची संधी मिळणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चॅटबॉटद्वारे मार्गदर्शन आणि प्रश्नांचे निराकरण करण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. मंजूर झालेला दाखला ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविण्यात येईल. या नव्या ऑनलाइन प्रणालीसाठी शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ५०० रुपये, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक हजार रुपये, सेवाविषयक प्रयोजनासाठी एक हजार रुपये, तर शासकीय योजनांच्या लाभासाठी एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल.

Source: Cosmo News Desk

Related Posts