Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • मालेगाव मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे
Nashik

मालेगाव मनपा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे

नाशिक | मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्तपद रिक्त झाल्यानंतर आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने अधिकृत आदेश जारी केला आहे.

नगरविकास विभागाचे आदेश

प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत मालेगाव मनपाचा अतिरिक्त कार्यभार धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येत असल्याचे शासनाच्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

भाग्यश्री विसपुते यांच्याकडे प्रशासकीय धुरा

विशेष म्हणजे, भाग्यश्री विसपुते या मालेगावच्याच कन्या आहेत. त्यांच्याकडे या महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी आल्यामुळे आता शहराच्या प्रशासकीय कारभाराची धुरा मालेगावशी नाळ जुळलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आली आहे. दरम्यान, आयुक्त जाधव ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले असून, त्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे हे पद रिक्त झाले होते. सध्या अतिरिक्त कार्यभार दिला असला, तरी मनपाला लवकरच पूर्णवेळ आयएएस अधिकारी मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts