Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • मालेगाव मनपा महासभा तहकूब, आयुक्तांच्या नामकरणाचा पेच टळला
Nashik

मालेगाव मनपा महासभा तहकूब, आयुक्तांच्या नामकरणाचा पेच टळला

नाशिक | मालेगाव महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, गुरुवारी (दि. २९) होणाऱ्या महासभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. आयुक्तांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्याच्या प्रस्तावावरून सभेत वाद होण्याची शक्यता असल्याने महापौर नसरीन शेख यांनी महासभा तहकूब केली. यामुळे लाचखोरीच्या कारवाईसोबतच महासभा तहकुबीची चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे.

नामकरणाचा प्रस्ताव आणि संभाव्य वाद

सत्ताधारी इस्लाम पक्षाचे नगरसेवक उद्धव दरेकर यांनी महाभेच्या विषयपत्रिकेत मिल्लत मदरसा ते आग्रा रोडदरम्यानच्या रस्त्याला आयुक्त रवींद्र जाधव यांचे नाव देण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून एमआयएमकडून तीव्र विरोध दर्शवला जाण्याची चिन्हे होती. पक्षाच्या गटनेत्यांनी नगरसेवकांना व्हीप बजावून उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. इस्लाम पक्षाचे नगरसेवक अस्लम अंसारी यांच्या सूचनेनुसार महापौरांनी ही महासभा तहकूब केल्याची चर्चा आहे. आयुक्तांवर झालेल्या लाचखोरीच्या कारवाईमुळे सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता वाढली होती.

ठेकेदारांमध्ये अस्वस्थता आणि राजकीय वर्दळ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर महानगरपालिकेतील ठेकेदारांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आयुक्तांसह स्वीय सहायक आणि लेखा विभागातील कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याने बिलांची मंजुरी व देयकांच्या वितरणाकडे लक्ष वेधले गेले आहे. या कारवाईनंतर न्यायालयापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत मनपा कर्मचारी, आजी-माजी महापौर, नगरसेवक आणि ठेकेदारांची मोठी वर्दळ दिसून आली. या प्रकरणाचा तपास पुढे गेल्यानंतर कंत्राटदारांचे व्यवहार आणि मनपाच्या निर्णयप्रक्रियेबाबतचे धागेदोरे स्पष्ट होणार आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts