Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Nashik
  • काशीत त्र्यंबकच्या अल्पवयीन बंधूंचे दंडक्रम पारायण
Nashik

काशीत त्र्यंबकच्या अल्पवयीन बंधूंचे दंडक्रम पारायण

नाशिक | भारतीय वेदपरंपरेचे जतन आणि संवर्धनाच्या उद्देशाने काशी येथे श्री शुक्ल यजुर्वेद कंठस्थ दंडक्रम पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानतर्फे आयोजित या पारायणास दि. २७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार असून हे पारायण दि. १७ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे १८ वर्षीय वेदोपासक अद्वैत शैलेंद्र काकडे आणि १३ वर्षीय वेदोपासक समर्थ शैलेंद्र काकडे हे दोन अल्पवयीन बंधू कंठस्थ दंडक्रम पारायण सादर करणार आहेत. प्रशांत जोशी आणि किरण पाठक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

पारायणाची वेळ आणि ठिकाण

याचे आयोजन काशीतील हनुमान घाट परिसरातील कांची शंकराचार्य मठात होत आहे. दि. २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या काळात दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पारायण होईल. दंडक्रम पारायण हे वेदपठणातील विशेष पद्धतींपैकी एक आहे. यात शब्दांचा ठराविक क्रमाने पुनरुच्चार होतो. मंत्र पाठ असणे पुरेसे नसून, शब्दक्रम आणि उच्चारांचे अचूक ज्ञानही आवश्यक असते. अशा पारायणास अभ्यास आणि कठोर साधना लागते. यासाठी स्वामी कांची कामकोटी पीठ शंकराचार्य, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, चतुर्वेदशास्त्री विश्वनाथजी देव गुरुजी आणि श्रीकृष्णभट्ट गोडसे गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळाले.

अल्पवयीन वेदोपासकांचे योगदान

पारायणामध्ये सहभागी वेदोपासक अद्वैत (१८) व वेदोपासक समर्थ (१३) यांनी कमी वयात शुक्ल यजुर्वेदाचे कंठस्थ दंडक्रम पारायण करण्याचा त्यांचा प्रयत्न वेदाध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. वेदांचे मंत्र, अचूक उच्चार, स्वर आणि विशिष्ट क्रम लक्षात ठेवण्यासाठी सराव, एकाग्रता, गुरूंचे मार्गदर्शन त्यांनी प्राप्त केले आहे. एक हजार वर्षांच्या इतिहासात कमी वयातील विश्वविक्रमी ऐतिहासिक पारायण असा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला आहे. कठीण आणि प्रगत स्वरूपाच्या या पारायणासाठी विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, स्मरणशक्ती आणि वेदपठणातील प्रावीण्यास विशेष महत्त्व आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts