Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • विद्यापीठांनी नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे: राज्यपाल
Maharashtra

विद्यापीठांनी नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावे: राज्यपाल

शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आणि उपस्थित मान्यवर

कोल्हापूर | विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास तसेच रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जे.जे. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ सभागृहात संपन्न झाला.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मार्गदर्शन

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्याचे सुचवले. उच्च शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी तरुणांचे घटते प्रमाण आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली. गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ सारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राजभवनात ‘फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी फोरम’ सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या सोहळ्यात विविध गुणवंत विद्यार्थ्यांना कुलपती व मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये तनुजा बाजीराव साळुंखे यांना राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.

जनरल जे.जे. सिंग आणि कुलगुरूंचे विचार

प्रमुख पाहुणे जनरल जे.जे. सिंग यांनी विकसित भारत घडवण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. संशोधकांचे संशोधन सामान्य माणसांचे जीवन सुकर करण्यासाठी उपयोगात आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे असून २८७ संलग्नित महाविद्यालये आहेत. या दीक्षांत सोहळ्यात ६० हजार २५० स्नातकांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली, यामध्ये ३४ हजार ६७० विद्यार्थिनींचा समावेश आहे. सोहळ्याचे आभार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानले.

Source: Cosmo News Desk

Related Posts