Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा येथे शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी
Maharashtra

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा येथे शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी

पालकमंत्री संजय शिरसाट शिवगड तांडा येथे शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना

छत्रपती संभाजीनगर | दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी त्यांच्यासोबत असल्याची भावना रुजविण्यासाठी सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा येथे जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांना मिठाई, भेटवस्तू व शिधा वाटप करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार यंदा दिवाळीत शेतकऱ्यांच्या सोबत गावात जाऊन दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश देण्यात आला आहे.

रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी भेट

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिवगड तांडा येथे दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेण्यात आली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या कुटुंबीयांना कपडे, फराळ आणि मिठाई देण्यात आली तसेच आपुलकीने संवाद साधण्यात आला. या भेटीतून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचा संदेश देण्यात आला. शेतकरी आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असून त्यांना दुष्काळासारख्या आपत्तीत सर्वजण सोबत असल्याचे सांगत धीर देणे महत्त्वाचे असल्याचे श्री. शिरसाट यांनी यावेळी नमूद केले.

विविध भागात शिधा वाटप आणि उपस्थिती

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा व्यतिरिक्त वडगाव कोल्हाटी, प्रति पंढरपूर आणि सातारा परिसर या विविध ठिकाणी जाऊन देखील शिधा वाटप केला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या सर्व दौऱ्यादरम्यान व कार्यक्रमांमध्ये त्यांचे समवेत स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळग्रस्त नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना दिवाळीच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्याच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.

Source: Cosmo News Desk

Related Posts