Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञानाची सांगड
Maharashtra

राज्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञानाची सांगड

आरोग्य सेवा आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित बैठक

मुंबई | राज्यातील आरोग्यसेवा अधिक गुणवत्तापूर्ण, परिणामकारक आणि नागरिकांच्या गरजांशी सुसंगत करण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण यांची सांगड घालण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सर्वसामान्यांना सक्षम आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत ‘द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने आरोग्यविषयक संशोधन आणि धोरणनिर्मिती सक्षम करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय संस्थेचे सहकार्य आणि आरोग्य संशोधन

आरोग्यातील निर्णय केवळ उपलब्ध माहितीवर नव्हे, तर शास्त्रीय संशोधनातील पुराव्यांवर आधारित असावेत, हा या सहकार्याचा उद्देश आहे. प्राधान्यक्रम निश्चित करणे, योजनांचे मूल्यमापन करणे आणि त्रुटींवर उपाययोजना विकसित करण्यासाठी याचा उपयोग होईल. ‘द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क’ ही १९८० मध्ये स्थापन झालेली संस्था असून २०२३ पासून ती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सहयोगी उत्कृष्टता केंद्र आहे. देशातील २५६ हून अधिक संस्थांचे नेटवर्क असलेल्या या संस्थेने ७० हून अधिक मोठ्या बहुकेंद्रीय संशोधन अभ्यासांचे समन्वयन केले असून महाराष्ट्रातील १५ हून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत काम केले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांमधील संशोधन क्षमता वाढविणे

विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने प्राध्यापक, तरुण संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात संशोधन पद्धती, जैवसांख्यिकी, डिजिटल डेटाबेस व्यवस्थापन आणि संशोधन प्रस्ताव तयार करणे यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय प्रशिक्षण आणि इंटर्नशिप आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिजननुसार वैद्यकीय शिक्षण, वैज्ञानिक संशोधन आणि प्रत्यक्ष आरोग्यसेवा यांच्यात समन्वय वाढवून आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Source: Cosmo News Desk

Related Posts