Shopping cart

No Widget Added

Please add some widget in Offcanvs Sidebar

TnewsTnews
  • Home
  • Maharashtra
  • राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लातूरमध्ये केली दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Maharashtra

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लातूरमध्ये केली दुष्काळी परिस्थितीची पाहणी

राज्यपाल जिष्णू देव वर्मा लातूरमध्ये शेतीची पाहणी करताना

लातूर | राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळीच्या बागेची आणि नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि रोजगाराविषयी माहिती घेतली. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना उपस्थित होते.

शेतकऱ्यांशी संवाद आणि उपाययोजना

नायगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन विविध माध्यमांतून मदत करत आहे. व्हीबी-जी रामजी योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यास मदत होईल. संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जास्तीत जास्त मदत आणि पीक विम्याची भरपाई मिळावी यासाठी पावले उचलली जात आहेत, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.

सहकार मंत्र्यांचे मार्गदर्शन व लाभांचे वितरण

यंदाचा दुष्काळ अधिक भीषण असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान दिले जाईल आणि अवैध सावकारीविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, प्रमाणपत्रे आणि लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत लाभ, चारा लागवडीसाठी बियाण्यांचे वाटप, ट्रॅक्टर व कडबा कुट्टी यंत्रांचे वितरण, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेची मंजुरीपत्रे आणि अवैध सावकारीच्या कब्जातून मुक्त झालेल्या जमिनीचा सातबारा उतारा सुपूर्द करण्यात आला. तसेच राज्यपालांनी नायगाव येथे रोहयो मजुरांच्या कामाची पाहणी करून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

Source: Cosmo News Desk

Related Posts